Buddhi Prerana Va Kranti Bhag 2: बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
श्री. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या “Reason, Romanticism + Revolution” या विचारप्रवर्तक ग्रंथाचा मराठी अनुवाद बा. रं. सुंठणकर यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. बुद्धी, प्रेरणा व क्रांती भाग २ ग्रंथाचा हा दुसरा खंड आहे. श्री.… रॉय हे अस्सल बुद्धिवादी आणि पूर्ण जडवादी होते. त्या भूमिकेवरूनच त्यांनी आपले “नवमानवतावादा”चे तत्त्वज्ञान मांडले. या ग्रंथात त्यांची तत्त्वप्रणाली संक्षेपाने ग्रंथित झाली आहे. या प्रथम खंडात प्रारंभी इतिहासाच्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन विशद करून त्यांनी आधुनिक युरोपीय संस्कृती आणि तिच्यातील विविध तत्त्वप्रणाली यांचे साक्षेपी पर्यालोचन केले आहे. मानवी स्वभावाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून पृथक्करण करून नियमबद्ध विश्वकल्पनेच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध विचारप्रवाहांचा विकास कसा झाला याचे दिग्दर्शन केले आहे. रेनेसान्स, धर्मसुधारणा, आधुनिक तत्त्वज्ञानाचा उदय, प्रबोधन, फ्रेंच राज्यक्रांती, या अर्वाचीन युरोपच्या इतिहासातील प्रमुख घटनांचे वस्तुनिष्ठ आणि चिकित्सक दृष्टीतून समीक्षण करण्यात आले आहे. विचारांचे स्वतःचे असे स्वतंत्र गतिशास्त्र आणि तर्कशास्त्र असते, हा रॉय यांचा सिद्धान्त विविध विचारसरणीच्या संदर्भात या ग्रंथात विस्ताराने दिग्दर्शित करण्यात आला आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे.