Bhartiya Musalman: भारतीय मुसलमान
Audio avec voix de synthèse, Braille automatisé
Résumé
प्रा. मुजीब लिखित "The Indian Muslims" या पुस्तकाचा संक्षिप्त अनुवाद भारतीय मुसलमान हा आहे. ब्रिटिश अमदानीत आणि त्यानंतर जे इतिहास लिहिले गेले त्यांनाही हा नियम लागू आहे. अशा प्रकारच्या इतिहासांची किंवा विशिष्ट ऐतिहासिक घटना अथवा प्रश्न यावर लिहिल्या गेलेल्या प्रबंधांची… सर्वसामान्य चर्चा करणे येथे अप्रस्तुत होईल. हा ग्रंथ हिंदी मुसलमानांवर लिहिलेला असल्यामुळे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. तुरळक अपवाद वगळता मुसलमान इतिहासकारांनी निष्पक्षदृष्टी ठेवलेली दिसत नाही. त्यामुळे आजवर मुसलमान समाजाचे व्यक्तिमत्व, त्यांचे प्रश्न आणि यशापयश यांचे संपूर्ण आकलन होऊ शकलेले नाही. प्रस्तुत ग्रंथाची मोठी व्याप्ति पाहता उपलब्ध साधनांचा साकल्याने अभ्यास करणे आवश्यक असूनही ते लेखकाच्या आवाक्याबाहेरचे काम होते.